इंडिया की भारत चर्चा टाळा; मोदींचे सौम्य धोरण

पुणे | PM Narendra Modi – लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाच्या नावामधून इंडिया (India) वगळून भारत (Bharat) करणार का, अशी चर्चा रंगू लागली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंत्र्यांना इंडिया- भारत ही चर्चा टाळा असं सांगितलं आहे. पंतप्रधानांची ही भूमिका पाहिल्यावर राजकीय पटलावर एकदम आश्चर्य व्यक्त झाले. मोदी यांच्या असंख्य समर्थकांनी भारत हाच देशाच्या नावाचा उल्लेख व्हावा, असा प्रचार आक्रमकपणे चालू केला.
अमिताभ बच्चन, कंगना राणावत यांनी भारतमाता की जय असा पुकारा करून भारत याच शब्दाचा पुरस्कार केला. त्यामुळे भाजपत उत्साह होता.. मोदी विरोधकांनी आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवल्याने भाजपने भारत नावाचा बदल करण्याचे ठरविले, असा आरोप होऊ लागला. मोदी यांनी योजनांना मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशी नावे ठेवली, त्यावेळी इंडिया असा देशाच्या नावाचा उल्लेख का केला, असा मुद्दा इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी उपस्थित केला.
राजकीय चर्चांना उधाण आले होते. याच दरम्यान चर्चा टाळा, असे मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना सांगून टाकले आहे.
मात्र, सनातन धर्मावर होणाऱ्या टीकेला उत्तर द्या, असे सांगितले आहे.
तामीळनाडूचे मुख्य मंत्री एम.के.स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी अलिकडे विधान केले की सनातन धर्म संपवून टाकायला हवा. त्यांच्या या विधानानंतर देशभर गदारोळ उडाला. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी इंडिया आघाडीला टार्गेट केले. स्टॅलिन यांना नरसंहार घडवायचा आहे का ? असे विचारले गेले. हा वाद धुमसतो आहे ..