स्पर्धा परीक्षांसाठी ‘2RE’ चा ‘स्मार्ट’ उपाय
Strat Up

आपल्या देशातील युवावर्ग सरकारी नोकरीच्या तयारीसाठी ६-७ वर्षे वाया घालवतो. परंतु, प्रत्येक तरुणाला एवढा वेळ का लागतो? याचे प्रमुख कारण म्हणजे स्पर्धा वाढली असून, परीक्षा (Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास १२,००,००० पेक्षा अधिक असते, तर जागा १,००० पेक्षा कमी! मागील वर्षांच्या आकडेवारीनुसार यशाचे प्रमाण फक्त 0.1% आहे, म्हणजेच 99.9% विद्यार्थी अपयशी ठरतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) विविध पदांसाठी घेत असलेल्या अनेक परीक्षांसाठी एकट्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी दरवर्षी भरलेले ३२ लाख फॉर्म विचारात घ्या. तथापि, सरकारी रोजगार वाढत नसल्यामुळे, अशा पदांसाठी फक्त ०.२०% अर्जदार निवडले जातात आणि हा आकडा वाढण्याची शक्यता नाही, या विचारांनी पछाडलेल्या झेर्टोन एज्युकेशन टेक्नॉलॉजीचे सह-संस्थापक सुजित चणखोरे आणि ऐश्वर्या पाटील यांनी ‘Listen2RE’ हे ऑडिओ प्लॅटफॉर्म सुरू केले. 2RE ॲप च्या फ्लॅटफार्म माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचणे, उजळणी करणे आणि संग्रह लक्षात ठेवण्याचे ओझे कमी करण्यास आणि संपूर्ण दैनंदिन दिनचर्या (Daily Routine) आखण्यास मदत करते.
कोट – 2RE कसा बदल घडवतो?
कोचिंग (Coaching) क्लासेस भरपूर आहेत, पण टेक्नोलॉजीचा (Technology) योग्य वापर करून विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण देणे शक्य आहे.तसेच 2RE विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिकृत अभ्यास, ऑडिओ फॉर्मेटमधील सामग्री, आणि स्मार्ट टेस्ट प्रेप तंत्रज्ञानाद्वारे शिकण्याचा वेगळा अनुभव देते.
– सुजित चणखोरे, सह-संस्थापक, 2RE
2RE चे वैशिष्ट्ये:
ऑडिओ बुक्स: अभ्यासक्रम ऑडिओ स्वरूपात उपलब्ध.
वैयक्तिकृत मार्गदर्शन: AI तंत्रज्ञानावर आधारित अभ्यास आणि प्रगतीचे विश्लेषण.
टेस्ट प्रेप फिचर्स: MCQs, फ्लॅश कार्ड्स, आणि स्व-मूल्यमापनाचे साधने.
फ्रीमियम मॉडेल: मोफत आणि प्रीमियम योजना.
प्रतिक्रिया –
स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचे गमक
“2RE मुळे अभ्यास सुलभ आणि वैयक्तिक झाला. ऑडिओ बुक्स मुळे प्रवासातही अभ्यास करता आला!”
– यशस्वी विद्यार्थ्याचे मत.
AI-आधारित ऑडिटिंग: विद्यार्थ्यांचा अभ्यास, वेळ, आणि मूड ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट टूल्स.
भविष्यातील योजना:
2RE महाराष्ट्रातील MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांसाठी अधिक सखोल मार्गदर्शन देत आहे. लवकरच, हे तंत्रज्ञान देशभर पसरवून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
तुमचे यश आमचे ध्येय: 2RE तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्मार्ट, सुलभ आणि योग्य साधने पुरवते.