सर्पमित्रांकडून ३५० पोपटांना जीवदान
जळगावात तरुणाकडून भूतदयेचे दर्शन
जळगाव : वरणगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे परिसरातील निलगिरीच्या वृक्षांवरील फांद्याची पडझड झाली. या वृक्षांवर शेकडो पोपट होते. वादळ पावसामुळे शेकडो पोपट झाडावरून पडू लागले. यात सुमारे ३०० पोपटांचा मृत्यू झाला. जखमी व मृत पोपटांना मोकाट श्वान व मांजरी घेवून गेल्यात. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र निशांत रामटेके यांना माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या ऑर्डनन्स फॅक्ट्री वरणगाव येथे काल शुक्रवारी मध्यरात्री वादळी पावसाने तडाखा दिला. या ठिकाणी असलेल्या निलगिरी वृक्षांच्या फांद्या वादळामुळे तुटून पडल्यात. यात फांद्यावरील ३०० पोपट मृत्यूमुखी पडलेत तर शेकडो जखमी होवून खाली पडले. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत ३५० जखमी पोपटांना जीवदान दिले. उपचार केल्यानंतर आज शनिवारी या पोपटांना मुक्त करण्यात आले.
वरणगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे परिसरातील निलगिरीच्या वृक्षांवरील फांद्याची पडझड झाली. या वृक्षांवर शेकडो पोपट होते. वादळ पावसामुळे शेकडो पोपट झाडावरून पडू लागले. यात सुमारे ३०० पोपटांचा मृत्यू झाला. जखमी व मृत पोपटांना मोकाट श्वान व मांजरी घेवून गेल्यात. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र निशांत रामटेके यांना माहिती दिली.
रामटेके यांच्यासह स्वप्नील सुरवाडे, भूषण कोळी, लखन लोहारे, अक्षय तेली, मनीष कोळी, सागर कोळी, राहुल कोळी, हर्षल कोळी, प्रतीक मेढे, धिरज सुरवाडे, आकाश सोनार, अनिकेत वांकेडे, कुणाल गुरचड, ललित, लखन रानसिंगे, मनोज अंबोडे, राहुल खरात, ओम शिंदे यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.
जखमी पोपटांना जीवदान: जखमी पोपटांना सुरक्षित स्थळी हलवले. काही पोपटांना पिंजर्यात ठेवले. परीसरातील एका खोलीत पोपटांना एकांतात सोडून खिडकी दार उघडे ठेवण्यात आले. बाहेरून मांजर किंवा कुत्रा आत येणार नाही याची काळजी घेण्यात आली. तासाभरात तणाव कमी झाल्याने पोपटांनी आकाशात भरारी घेतली.