क्रीडामहाराष्ट्र

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मयूरीने लुटले २ सुवर्ण, १ कांस्य

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : सायकलिंगमध्ये महिलांचे वर्चस्व, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

अहमदाबाद : महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू मयूरी लुटेने सायकलिंगमध्ये आज दुसरे सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेतील तिसरे पदक आपल्या नावावर केले. मयुरीने आज टीम स्पिंट प्रकारात सुशिला आगाशे व आदिती डोंगरे यांच्या बरोबरीने सुवर्ण, रविवारी झालेल्या २०० मीर स्प्रिंट प्रकारात सुवर्ण आणि शनिवारी ५०० मीटर टाईम ट्रायलमध्ये कांस्यपदक जिंकले हाते. महिलांच्या ३ हजार मीटर टीम परसुट प्रकारात महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या संघात सुशिकला आगाशे, पूजा दानोले, आदिती डोंगरे, वैष्णवी गभणे आणि कोमल देशमुख या खेळाडूंचा समावेश होता.नवी दिल्ली येथील आय. जी. स्टेडियम मधील वेलोड्रमवर सुरू असलेल्या सायकलिंग शर्यतींमध्ये महाराष्ट्राच्या महिलांनी वर्चस्व गाजविले.

weightlifting 1

वेटलिफ्टिंग : महिलांच्या ८७ किलो गटात महाराष्ट्राच्या कोमल वाकळेने स्नॅचमध्ये ८४ व क्लीन ॲण्ड जर्कमध्ये ११६ किलो वजन असे एकूण २१० किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

03TROPOLIN MEDAL

ट्रॉम्पलीन: सुवर्णपदक विजेता आदर्श भोईर.

trompline 1 1

कुस्ती: रौप्य पदक जिंकणारा वेताळ शेळके.

खो-खो : महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खोखो संघांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारुन सुवर्णपदक जिंकण्याच्या निधार्रावर शिक्कामोर्तब केले. महिला गटातील पहिल्या उपान्त लढतीत महाराष्ट्राने दिल्लीचा २२-१४ (२२-६) असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या महिला संघाकडून प्रियंका भोपी (३:२० मि. संरक्षण), प्रियंका इंगळे (३:५० मि. संरक्षण व ८ गुण ), रेश्मा राठोड (२ मि. संरक्षण व ६ गुण) व अपेक्षा सुतार (२ मि. संरक्षण व २ गुण) या खेळाडूंनी अफलातून खेळ करताना दिल्लीच्या आक्रमणातील धार बोथट केली. पुरुष गटात महाराष्ट्राने कर्नाटकवर २६-१० असा एक डाव आणि ४ गुणांनी विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या अविनाश देसाईने ८ गुणांची कमाई करुन संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. प्रतिक वाईकरने अष्टपैलू कामगिरी नोंदवताना २ मि. पळतीचा खेळ केला व २ गुणांची कमाई केली. लक्ष्मण गावसने १ मिनीटे संरक्षण केले व २ गुण संपादन केले. अक्षय भांगारेने १:३० मिनीटे पळतीचा खेळ केला. निहार दुबळेने १:२० मिनीटे संरक्षण केले व ४ गुण मिळवत संघाची स्थिती भक्कम केली. दिलराज सेनगरने २:१० मिनीटे पळतीचा खेळ केला आणि २ गुण मिळवले. राजमी कश्यपने २ मिनीटे व १:४० मिनीटे संरक्षण करुन सर्वांचीच मने जिंकली.

swim

डायव्हिंग : ऋतिका श्रीराम ठरली ‘जलपरी’
महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीराम हिने महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि खऱ्या अर्थाने ‘जलपरी’चा मान संपादन केला. तिने स्प्रिंग बोर्डवरून सूर मारताना अचूकता व लवचिकता याचा सुरेख समन्वय दाखवीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. तिने यापूर्वी शालेय आणि खुल्या गटातील अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरघोस पदके मिळविली आहेत. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तिला मिळाला आहे. याच प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिला ब्रॉंझपदक संपादन केले.

swim 1

ईशा वाघमोडे (कांस्य)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये