अर्थटेक गॅझेटताज्या बातम्या

2027 मध्ये धावणार देशातली पहिली बुलेट ट्रेन…

नवी दिल्ली : २०२७ मध्ये देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. तसंच २०२६ मध्ये या बुलेट ट्रेनची ट्रायल सुरू होणार असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड कॅारिडॅार चे संचालक सतीश अग्नीहोत्री यांनी दिली आहे. देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट मुंबई ते अहमदाबाद दरम्यान होतोय. तसंच या प्रोजेक्टसाठीचं भुसंपादन 99 टक्के पुर्ण झालं आहे. सोबतच सुरत येथे बुलेट ट्रेन स्थानकाचं उद्घाटन 2023 मध्ये पुर्ण होईल असा विश्वास अग्निहोत्री यांनी व्यक्त केला आहे. सुरत ते बिलिमोरा दरम्यानच्या 50 किलोमीटरच्या पट्टयात बुलेट ट्रेनचं ट्रायल सुरु होणार आहे.

या प्रोजेक्टच्या पाहणीकरिता जपानचे राजदुत आणि डेलिगेशन आले होते. भुसंपादनात अडचणी आल्याने तसेच, कोरोना महामारीमुळे बुलेट ट्रेन प्रोजेक्टला ब्रेक लागला होता. जपानचे राजदुत सतोशी सुझुकी यांनी या प्रकल्पाची पाहणी केली आहे. तसंच जपानच्या सहकार्याने बुलेट ट्रेन प्रोजेक्ट होत आहे. भारताची ईच्छा असेल तर आम्ही दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी सहकार्य करु असं विधान सतोशी सुझुकी यांनी केलं आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये