ताज्या बातम्यारणधुमाळी

‘इथे दंगली आणि अराजकतेला जागा नाही…’- योगी आदित्यनाथ

लखनौ: राम नवमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. मात्र अनेक राज्यात राम नवमीच्या उत्सवाला हिंसक गालबोट लागलं. मध्य प्रदेशात तर झालेल्या हिंसक वातावरणामुळे सरकारला लवाद स्थापन करावी लागली. अनेक राज्यात असेच प्रकार बघायला मिळत असले तरी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात राम नवमीच्या दिवशी एकही अनुचीत घटना घडली नाही असा दावा केला आहे.

ट्विटरवर ट्विट करत राज्यातील प्रशासनाची पाठ थोपटताना योगी म्हणाले की, “पण, कुठेही वाद झाला नाही… दंगली आणि कोलाहल सोडा. हा उत्तरप्रदेशच्या नव्या पुरोगामी विचारसरणीचा पुरावा आहे. इथे दंगली आणि अराजकतेला जागा नाही. उत्तर प्रदेश हे दाखवून दिले आहे,” , असे योगी आदित्यनाथ म्हणाले. मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि कर्नाटकात रविवारी रामनवमीच्या मिरवणुका काढण्यात आल्याने हिंसाचार झाला. गुजरातमध्ये, आणखी एक भाजपशासित राज्य, दोन-प्रभावित शहरांपैकी एक – हिम्मतनगरमध्ये नवीन हिंसाचार झाला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचे गोळे सोडावे लागले.

योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते असल्याचं नेहमीच पहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशाक सत्ता स्थापन केल्यानंतरच मुस्लीम बहुल शहरांची नावं बदलणे लहु जीहाद प्रतिबंधक कायदा करणे भगवत गीतेचा प्रसार करणे यांसारखे अनेक निर्णय घेतल्याचं ठळक पहायला मिळालं. मुस्लीम समुदयाचे सणांवर सातत्याने टीका करणारे योगी मात्र हिंदु सण सत्तेत आल्यावरही मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसतात. नुकतीच पार पडलेली राम नवमीचा उत्सवही मोठ्या जल्लोषात साजरा केला.

इतकंच नव्हे तर सणाच्या दिवशी अघटीत घडू नये म्हणून प्रशासनाची दांडगी फौजही त्यांनी राज्यभरात तैनात केली होती. आज याच उत्सवावर भाष्य करताना त्यांनी एकीकडे प्रशासनाची पाठ थोपटताना दुसरीकडे इतर राज्यात घडलेल्या हिंसक घटनांना जनतेचे लक्ष वेधून घेतले.

विधानसभेेची दुसरी टर्म योगी जिंकणार का याबाबत सर्वजण साशंक होते. समाजवादी पक्ष योगींना तगडी फाईट देणार अशा चर्चांनाही चांगलंच उधाण आलं होतं. युपीत एण्टी इन्कम्ब्नसीचा फटका नेहमी सत्ताधारी पक्षाला बसत असल्याचा पूर्वेतिहास सर्वांनाच परिचीत आहे. मात्र याला छेद देत भाजपनं दुसऱ्या टर्ममध्येही मुसंडी मारत बहुमत प्राप्त केलं. विकासाच्य मुद्दापेक्षाही प्रचारात हिंदुत्व धार्जीन वक्तव्या योगींकडून कानावर पडले. याचाच परिणाम सत्ता स्थापन करण्यात आला असा राजकीय निश्कर्ष निघत आहे. योगींनी राम नवमीच्या निमीत्ताने केलेलं ट्वीटही त्यांचंच द्योतक आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये