मोठी बातमी! राणा दांपत्याला न्यायालयीन कोठडी

मुंबई : राणा दांपत्याच्या हनुमान चालिसा प्रकरणावरुन काल राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तंग असल्याचं पहायला मिळालं, काही अघटीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीनं पाऊलं उचलत खार पोलिस ठाण्यात राणा दांपत्याला तातडीनं हलवण्यात आलं. अखेरीस वांद्रे न्यायालयानं राणा दांपत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांकडून त्यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. आज याप्रकरणी न्यायालयाात सुनावणीही पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, असा युक्तीवाद यावेळेस न्यायालयीन वकील प्रदीप घरत यांनी व्यक्त केला.