पुणे

दोन चारचाकींचा अपघात; एका प्रवाशासह पादचाऱ्याचा मृत्यू , तिघेजण गंभीर जखमी

पुणे : पुणे सोलापूर रोडवरती अचानक वळण घेतल्याने दोन चारचाकींचा अपघात झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.

मृत्यू झालेल्यांपैकी एकाची ओळख पटलेली नाही. तर एकाचे नाव श्रमिक प्रभाकर(२७) होते आहे. संकेत बाळासाहेब भंडलकर (वय २१), सुनिल निळाराम शितकल (वय २२),अनिल बाळासाहेब जाधव (वय २२) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मयत श्रणिक पुण्याकडून यवतला जात होता. श्रणिक मांजरी येथील द्राक्ष बागेच्याजवळ येताच, सोलापूरच्या बाजूने येणार्‍या चार चाकी वाहनांने दुभाजकापासून अचानक वळण घेतले. आणि दोन्ही वाहनाची समोरासमोर जोरात धडक झाली. त्यानंतर श्रणिक होले यांची गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली, त्याचवेळी रस्त्याच्याकडेने पायी जात असणाऱ्या व्यक्तीला श्रणिक यांच्या गाडीची जोरात धडक बसली. यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्या व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. तसेच दुसर्‍या चार चाकी वाहनातील तिघे जण गंभीर जखमी असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये