पंजाबमध्ये शिवसेना-शीखांत तुफान राडा; दगडफेक, तलवारीही उपसल्या

अमृतसर : पंजाबमधील पतियाला येथे आज दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान संघर्ष झाला. शिवसेनेनं खलिस्तानी गटांविरोधात काढलेल्या मोर्चात हा सारा गोंधळ घडला आहे. पंजाबमधील शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हशिष सिंघेला यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चावर दगडफेक करण्यात आली. या संघर्षामध्ये तलावारीही उपसण्यात आल्याने तणाव खुपचं तीव्र झाला आहे. शीख गटाच्या काही लोकांचा शिवसैनिकांसोबत हा वाद झाला. शिवसैनिक ‘खलिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत होते. त्यानंतर शीख समाजातील काही तरुण रस्त्यावर तलावारी घेऊन उतरले. नंतर अचानक दगडफेक दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.
दरम्यान, या सर्व गोंधळावर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस निर्देशकांशी आपली चर्चा झाल्याची माहितीत ते म्हणाले की, परिसरामध्ये सध्या शांतता आहे, पतियालामध्ये घडलेला प्रकार दुर्देवी आहे. मी डीजीपींसोबत बोललो आहे. या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यावर आमचं लक्ष आहे. पंजाबची शांतता सर्वात महत्वाची आहे, असं मान यांनी म्हटलंय.या प्रकरणानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी दोन्ही गटातील लोकांना शांतता बाळगण्याचं आव्हान करत आपआपसातील वाद आणि मतभेद चर्चेने सोडवण्याचं आवाहन केलंय