पुणे

नि:पक्षपातीपणे प्रभाग रचना होणार का?

उज्ज्वल केसकर यांचा आरोप

राज्य निवडणूक आयोगाने 2017 साली जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण हरकती सूचना मागवून निश्चित केले होते आणि त्याप्रमाणे निवडणुका घेतल्या होत्या. यातील तेवीस गावे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आल्यानंतर या गटाची आणि गणाची विभागणी करून या गावांतील लोकांना लोकप्रतिनिधित्व मिळणार नाही तर बाहेरचे प्रस्थापित नेते निवडणूक लढवतील आणि या गावातील लोक फक्त मतदान करतील, अशाप्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोयीची प्रभाग रचना केली गेल्याचा आरोप केसकर यांनी केला आहे.

पुणे : पुणे महानगरपालिकेने केलेल्या आणि आता रद्द झालेल्या प्रभागातील लोकसंख्येच्या गोंधळावरून महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी अधिकारी हे राजकीय दबावामध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून काम केले जात आहे, असा आरोप उज्ज्वल केसकर यांनी केला आहे. नवीन प्रभाग रचना करताना महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका निष्पक्षपातीपणे पुण्याची प्रभाग रचना करू शकतील का नाही, ही विशेष शंका आहे.

त्यामुळे पुण्याची प्रभाग रचना नगर विकास विभागातील नगर रचना संचालनालयाकडून करून घ्यावी आणि मग त्याला निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी, अशी मागणी केसकर यांनी नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्याकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेने केलेल्या आणि आता रद्द झालेल्या प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ४१ ते ४९ हे हडपसर मतदारसंघांमध्ये येतात. त्यांची सरासरी लोकसंख्या ५५००० एवढी ठेवण्यात आली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभागाची लोकसंख्या ६२००० दहा टक्के कमी जास्त असणे आवश्यक आहे. परंतु हडपसर भागातील सलग प्रभाग ५५००० एवढे लोकसंख्येचे ठेवल्यामुळे बाकीचे प्रभाग ६७ हजार ६८ हजार काही ७१००० इतपर्यंत मोठे झाले होते. हे लोकसंख्येनुसार प्रभाग करताना पूर्णपणे पक्षपातीपणा करण्यात आला होता. एक ना अनेक अशी कारणे आहेत की, त्यामुळे महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका निष्पक्षपातीपणे पुण्याची प्रभाग रचना करू शकतील का नाही याबाबत विशेष शंका असल्याचे केसकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये