देश - विदेशरणधुमाळी

प्रशांत किशोर यांच्या ट्विटने वाढवलं गूढ; म्हणाले…

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट करून पुढे कोणतं पाऊल उचलणार याबाबत सूचक इशारा दिला होता. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, समस्या आणि सुशासन समजून घेण्यासाठी आता ‘रिअल मास्टर’ अर्थातच लोकांकडे जाण्याची वेळ आली आहे. याची सुरुवात बिहारपासून होणार. त्या अगोदर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे काहीच सूचित केलं नाही. त्यामुळे ते नवीन राजकीय पक्ष सुरू करणार की विरोधी आघाडीत सामील होणार याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. बिहारमधील सत्ताधारी भाजप-जनता दल युनायटेड युतीपासून ते दूरच राहण्याचा प्रयत्न करतील. कारण काही दिवसांपासून ते नितीश कुमार यांची भेट टाळतं आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतची ऑफर नाकारल्याचं ट्विटरवर जाहीर केल्यानंतर, प्रशांत किशोर यांनी एका आठवड्याने हे ट्वीट केलं आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यरत असणाऱ्या कॉंग्रेस कमिटीचा सदस्य म्हणून बोर्डात येण्याबाबत कॉंग्रेसची ऑफर नाकारल्याची माहिती त्यांनी मागील ट्विटमधून दिली होती. काँग्रेसमध्ये मोठा बदल घडवून आणण्यासाठी त्यांना विशेष अधिकार पाहिजे होते. पण काँग्रेसने त्यांची मागणी अमान्य केली. त्यामुळे त्यांची बोलणी फिसकटली.

नवीन घोषणेनंतर आता ते बिहारमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला पुन्हा सुरुवात करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांनी चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांना जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. पण पक्षाअंतर्गत मतभेद झाल्यानंतर १६ महिन्यांत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये