ताज्या बातम्यारणधुमाळी

…जन्माला आलेली ‘मर्सिडीज बेबी’; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

नागपूर : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘१८५७ च्या युद्धात ही देवेंद्र फडणवीस असतील’ असा टोला लगावला होता. या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना ‘मर्सिडीज बेबी’ असं नाव दिलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, “सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ‘मर्सिडीज बेबी’ आहे, त्यांनी ना संघर्ष करावा ना संघर्ष पाहावा लागला. त्यामुळे कारसेवकांची थट्टा ते नक्की उडवू शकतात. मी हिंदू आहे त्यामुळे मागच्या जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे 1857 मध्ये मी नक्की तात्या टोपे आणि झाशीची राणी यांच्याबरोबर युद्धात असेन आणि हे त्याही वेळी इंग्रजाबरोबरच युतीमध्ये असणार. तुम्ही आताही अशा लोकांशी युती केली आहे जे 1857 ला स्वातंत्र्य युद्धच मानत नाही. ते त्याला सैनिकांचे बंड म्हणतात.”

दरम्यान, बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता, मी उपस्थित होतो, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरे यांनी टोला लगावत, फडणवीस 1857 च्या युद्धातही असतील असं म्हटलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये