पालिकेतर्फे कारवाईचा धडाका

पुणे महानगरपालिकेने सुमारे आठवडाभरात थकबाकी वसुलीसाठी व्यावसायिक हेतूने भाडेतत्त्वावर दिलेल्या ५९ दुकाने सील केली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे म्हणाले, की नागरी प्रशासनाने थकबाकी भरण्यास सांगूनही या मालमत्ताधारकांनी भाडे भरलेले नाही. त्यामुळे ही कारवाईकरण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतही अशाप्रकारची कारवाई सुरूच राहील.
पुणे ः पुणे महानगरपालिकेने सुमारे आठवडाभरात थकबाकी वसुलीसाठी व्यावसायिक हेतूने भाडेतत्त्वावर दिलेल्या ५९ दुकाने सील केली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे म्हणाले की, नागरी प्रशासनाने थकबाकी भरण्यास सांगूनही या मालमत्ताधारकांनी भाडे भरलेले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत अशाप्रकारची कारवाई सुरूच राहील. पर्वती, हडपसर, वाकडेवाडी परिसरातील दुकाने सील करण्यात आली आहेत.
या दुकानांच्या रहिवाशांची सुमारे २.४४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी प्रशासनाने वसुली मोहीम सुरू केली आहे. अशा दुकानदारांकडून आतापर्यंत सुमारे चार कोटी रुपये जमा झाले आहेत. प्रशासकराज आल्यापासून कारवाईने जोर धरला असून, थकबाकी न भरणार्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार आहे.