राणांवरील कारवाईची दिल्लीत गंभीर दखल
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिले. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसरीकडे नवनीत राणा यांच्यावरील कारवाईनंतर आता दिल्लीत मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे.
अखेर जामिनावर सुटका झाल्यानंतर हे दोघेही बाहेर आले. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे शिवसेना आणि पर्यायाने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होते.
राणा दाम्पत्यावर केलेल्या कारवाईनंतर केंद्रीय यंत्रणा येत्या आठवड्यात शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांवर कारवाई करणार येईल, अशी माहिती मिळते. भाजप नेते किरीट सोमय्या वरिष्ठ अधिकार्यांशी होत असलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.