ताज्या बातम्यारणधुमाळी

‘राणे दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत…’; आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडण्यासाठी निघाले आहेत असा आरोप केला आहे. दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघाली आहे. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे असं आशिष शेलार म्हणाले आहेत. अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावं बघून केली जात आहे असा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आशिष शेलार म्हणाले, “शाहीन बाग आणि जहांगीरपुरीमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचं काम आहे. पण गेल्या २५ वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, घराशेजारी असलेल्या बेहरामपाडा इथे सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे, आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत असा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला. सरकारने असा भेद करु नये असंही ते म्हणाले.

“राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिकेकडून घरं तोडण्यासाठी नोटीस दिल्या जात आहेत. गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केलं नाही का? हा जाती, धर्मभेद नाही; तर अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी आहे,” असंही आशिष शेलार म्हणाले.

“बेहरामपाडा दिसत नाही आणि शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड करता. राणे दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत. ते अनिधिकृत नाहीत असं म्हणायचं आहे का? आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावं बघून केली जात आहे,” असा आरोप देखील शेलार यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये