ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…तुम्ही त्यापेक्षा खराब आहात’; अरविंद सावंत यांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे खरे पुरस्कर्ते कोण? यावरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला स्थानिक संघटनांचा आणि भाजपा खासदार बृजभूषण यांचा तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला असताना आता राज ठाकरेंचं नाव न घेता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं असताना त्यांच्या दौऱ्यावरून राजकारण सुरू झालं आहे. “राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझं म्हणणं ऐकलं नाही, माफी मागितली नाही तर मी वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत”, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. यानंतर आता शिवसेनेने देखील राज ठाकरेंवर टीका केली आहे.

“हिंदुत्वाची रस्सीखेच कसली? ज्यांच्याकडे रस्सीच नाही, त्यांनी खेचायचं काय? रस्सी विचारांची असली पाहिजे. सरडाही रंग बदलतो. कदाचित त्यालाही लाज वाटेल, इतके लोकांनी रंग बदललेत. सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात. असली-नकली लोकांना कळतं”, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“देशाला हिंदुत्वाचा विचार कुणी दिला? शिवसेना प्रमुखांनी”, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. तसंच, “गेले ३ वर्ष तेच तुणतुणं वाजवत आहेत. उद्धव ठाकरे संयमी आहेत. त्यांनी तमाशा पाहून घेतलेला आहे. १४ मेला या. त्या तुणतुण्याची तार कशी तुटते, ती बघा”, असा टोला देखील सावंत यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये