पुणेसिटी अपडेट्स

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना ६९ लाखांचा उपदान निधी

इंदापूर : इंदापूर नगरपालिकेत विविध विभागात काम करणारे माजी कर्मचारी यांना, सेवानिवृत्तीनंतर मिळणार्‍या लाभापैकी, उपदान व काही कामगारांचा सातवा वेतन आयोगातील उपदानाची फरक मिळून, सेवानिवृत्त कामगार यांना ६८ लाख ८२ हजार ७८९ रुपये इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यामुळे निवृत्त कर्मचार्‍यांनी आनंदोत्सव साजरा करीत नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचा सत्कार केला.

ज्यांना उपदान व वेतन आयोगाचा फरक मिळाला आहे. त्या कर्मचार्‍यांनी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, कामयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे यांचा सत्कार केला. यावेळी माजी पाणीपुरवठा विभागप्रमुख सहदेव व्यवहारे, बळी शिंदे, अंकुश बोराटे, सुरेश शिंदे, संजय कवडे, अरुण मखरे, अरुण ठोंबरे उपस्थित होते, तर सर्व नगरसेवक, नगरसेविका व नगरपालिकेच्या लेखा विभागाचे अधिकारी, आस्थापना विभाग अधिकारी यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये