एमआयएमच्या अकबरुद्दीन ओवैसींनी घेतलं औरंगजेबच्या कबरीचं दर्शन

वादाची शक्यता
औरंगाबाद : एमआयएम पक्षाचे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण देखील उपस्थित होते. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलेलं दिसत आहे. या घटनेमुळे वाद निर्माण होण्याच्या शक्यता दर्शवल्या जात आहेत.
अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याची सुरूवात त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेऊन केली आहे. ते सध्या औरंगाबादमधील एका महिला शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आलेले आहेत. त्यावेळी ते म्हणाले कि, “आज ते एका चांगल्या उपक्रमासाठी आलेले आहेत. आम्ही जे काम केलेले आहेत अशा घोषणा दुसऱ्या पक्षानेसुद्धा कराव्यात.” असं ते बोलताना म्हणाले.
त्याचबरोबर, खुल्ताबादमध्ये खूप मोठेमोठे दर्गे आहेत. त्यांना मोठा इतिहास लाभलेला आहे. तिथे कुणीही गेलं तर त्या कबरीचं दर्शन घेतं त्यामुळे त्यामध्ये वेगळा अर्थ काढू नये. आता सगळे रन्गामचे झाले आहेत असंही ते म्हणाले.