देश - विदेशरणधुमाळी

त्रिपुराच्या मुख्यमंत्रीदाची माळ माणिक साहा यांच्या गळ्यात…

आगरतळा : त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा बिप्लब कुमार देव यांनी राजीनामा दिल्यानंतर माणिक साहा आता त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. माणिक साहा महिनाभरापूर्वीच राज्यसभेवर निवडून आले होते. त्यानंतर आता त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राज्यसभेची एक जागाही रिक्त होणार आहे. या राज्यसभेतून बिप्लब देब यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे.

दरम्यान, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी तडकाफडकी राजीनामा आज दिला. भाजपनं मुदत संपण्याआधीच देव यांना पदावरून हटवलं. यानंतर काही तासांतच भाजपनं नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली आहे. डॉ. माणिक साहा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांच्यावर केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये