देश - विदेश

अजित पवारांनी दिलेलं आव्हान राज ठाकरेंनी स्विकारलं?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक सभेत राज ठाकरे यांना दिवसा सभा घेण्याच आव्हान दिलं होतं. दादांचं हे आव्हान राज ठाकरेनं स्विकारलं अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा या आठवड्याच्या शेवटी होईल. ही सभा नदीपात्राऐवजी सभागृहात होणार आहे. तसेच यासंदर्भात अधिक माहिती राज ठाकरे ट्विट करत देतील अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.

दरम्यान, दादांनी राज ठाकरे यांना भर दुपारी सभा घेण्याचे आव्हान दिलं. आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दूपारी सभा घेतली का? असा सवाल अजित पवार यांनी केला. कधी कष्ट घेतले आहेत का? यांची सभा होती संध्याकाळी. उगीच लोकांची दिशाभूल करायची, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकीय स्वार्थापोटी समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरु आहे. चांगले वातावरण गढूळ करण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे असे अजित पवार म्हणाले.पवारांच्या या आरोपानंतर राज ठाकरे यांनी थेट पुण्यात सभा आयोजित केली आहे.ती दुपारी होणार असुन नदीपात्रात होण्याऐवजी सभगृहात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये