“मुंबईत आला तर ब्रिजभूषण सिंग यांच्या तंगड्या हातात देऊ”

रत्नागिरी : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी सर्वात आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येत पाय ठेऊ देणार अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे ते कायम चर्चेत राहिले आहे. तर आता ते मुंबईत येऊन सभा घेणार असल्याच्या चर्चेला सुरवात झाली आहे. यामुळे मनसे मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी ‘मुंबईत आला तर ब्रिजभूषण सिंग यांच्या तंगड्या हातात देऊ’ असा इशारा देण्यात आला आहे.
तसंच पुण्यामध्ये झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा काही काळ रद्द करत असल्याचं सांगितलं होत. त्यावेळी हा सगळा एक ट्रैप असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. आता त्यानंतर वैभव खेडेकर यांनी बृजभूषण यांना इशारा दिला आहे. वैभव खेडेकर म्हणाले की,ज्या सुपारीबाज ब्रिजभूषण सिंग याने राज ठाकरे यांना अयोध्येत यायला विरोध केला, एक हिंदू असून एका हिंदूला श्री रामांच्या दर्शनाला येण्यापासून त्यानं थांबवलं,तसंच त्यानं राज साहेबांसोबत येणाऱ्यांना शरयू नदीत बुडवण्याची भाषा त्याने केली. इतकं करूनही जर तो मुंबईत येऊन सभा घेणार असेल तर त्यानं हिम्मत असेल तर मुंबईत येऊन दाखवावं . त्याच्या तंगड्या हातात दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अशा शब्दात खेडेकर यांनी ब्रिजभूषण सिंग यांना इशारा दिला.
याचबरोबर जेव्हापासून राज ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन घेण्याचं सांगितल तेव्हा पासून अनेकांच्या पायखालची वाळू सरकली. राज ठाकरे यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला.तुम्ही पाहिलंच असेल बृजभूषण सिंह यांचे फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर व्हायरल झाले. त्यांना महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली मग बृजभूषण सिंह यांनी अशी भूमिका घेतली असल्याचं खेडेकर म्हणाले.