‘…म्हणून राज ठाकरे रुग्णालयात दाखल’; उद्या होणार मोठी शस्त्रक्रिया!
मुंबई | Raj Thackeray’s Big Surgery | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात (Lilawati Hospital) दाखल झाले आहेत. तसंच उद्या (१ जून) त्यांच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) केली जाणार आहे. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची (Hip Bone) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे आजच ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर शस्त्रक्रियेपूर्वीच्या काही चाचण्या आज केल्या जातील.
राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. तसंच काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरेंनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, “१ जूनला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे मी येथे जाहीरपणे सांगितलय कारण कुणालाही न सांगता गेलो तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही.”
दरम्यान, मध्यंतरीच्या काळात टेनिस (Tennis) खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला राज यांना दिला आहे. त्यानुसार उद्या त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडेल.