देश - विदेश

प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना दहा दिवसांची सीबीआय कोठडी

मुंबई | Avinash Bhosale Remanded CBI Custody | येस बँक(Yes Bank)-डीएचएफएल (DHFL) फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा अविनाश भोसले यांचा दावा कोर्टानं फेटाळला आहे. तसंच कोर्टाने साबीआयला भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई केली आहे.

अविनाश भोसले यांना सीबीआयने २६ मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर २७ मे रोजी त्यांना मुंबईतील सीबीआय कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयनं भोसलेंची १० दिवसांकरीता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. मात्र कोर्टानं हा दावा फेटाळला आहे.

दरम्यान, अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. तसंच रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये