“यमा आम्ही तुला कधीच माफ करणार नाही!”; ‘केके’ साठी हेमांगी कवीची खास पोस्ट
मुंबई | प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ (KK) म्हणजेच ‘केके’ चं मंगळवारी रात्री निधन झालं आहे. कोलकत्यामध्ये लाइव्ह कॅान्सर्टदरम्यान (Kolkatta Live Consert) अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचं १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं आहे. तो ५३ वर्षांचा होता. त्याचबरोबर केकेच्या निधनानं संपूर्ण संगीत क्षेत्रासह, सेलिब्रेटींना (Celebrity), चाहत्यांना धक्का बसला आहे. तसंच अभिनेत्री (Actress) हेमांगी कवीने (Hemangi Kavi) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘केके’ ला श्रद्धांजली वाहिली आहे.
हेमांगी कवीने केकेचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये केकेसाठी एक खास पोस्ट देखील लिहीली आहे. “मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला! शाळा संपून कॉलेज मधल्या नवनवीन हवेत ‘यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल’ या गाण्यांवर तरंगायला लागलो. पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्या सारखं झालं. 90s मधल्या लोकांना कळेल मी काय म्हणतेय ते, काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, time travel सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा घेऊन गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!” असं कॅप्शन हेमांगीने दिलं आहे.
दरम्यान, केके कोलकत्ता येथे झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर काही वेळातच त्याच्या टीमसोबत हॉटेलकडे रवाना झाला. तसंच ईटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच केकेने छातीत दुखत असल्याचे सांगितलं. त्यानंतर त्याला सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथे डॉक्टरांनी केकेला मृत घोषित केलं. सध्या त्याच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे.