“अहमदनगरचे नाव बदलून…”; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

मुंबई – Ahmednagar Name changing Issue | राज्यात कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष चालू आहे. अशातच आता औरंगाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopicand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना अहमदनगरच्या नामांतराबाबतच्या (Ahmednagar Name changing Issue) मागणीसंदर्भात पत्र लिहिलं आहे.
‘हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा (Ahilya Devi) जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी पत्रामध्ये केली आहे.
दरम्यान, नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल. जय अहिल्या, जय मल्हार, असं म्हणत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.