ऐकावं ते नवलच! “तरुण दिसण्यासाठी मी ‘विष्ठाही’ खाईल”; प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक विधान

मुंबई | Kim Kardashian’s sensational statement- प्रसिद्ध अमेरिकन रिअॅलिटी शो स्टार (Famous American Reality Show Star) किम कार्दशियन (Kim Kardashian) काही ना काही कारणांमुळे नेहमी चर्चेत येत असते. तसंच ती तिच्या फॅशन, खासगी आयुष्य आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत येत असते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किमने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे किम सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिला ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागत आहे.
नुकतीच किमने न्यूयॅार्क टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की ती तरुण दिसण्यासाठी काय करु शकते? यावर उत्तर देताना किम म्हणाली की, “मी काहीही करेन. जर तुम्ही मला सांगितलं की मला तरुण दिसण्यासाठी दररोज विष्ठा खावी लागेल तर कदाचित मी ते देखील करु शकते.” किमच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.
दरम्यान, किम या आधी पती आणि रॅपर कान्ये वेस्ट घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर किम कॅामेडीयन पीट डेव्हिडसनसोबत रिलेशनशिपमध्ये आली. तसंच बऱ्याच वेळा ते दोघे एकत्र दिसतात. त्याचबरोबर अलीकडेच किमने तिची नवीन ब्यूटी लाइन आणि परफ्यूम ब्रँड देखील लाॅन्च केला आहे.