आनंदाची बातमी! केंद्रीय कर्मचार्यांची ‘अशी’ होणार पगार वाढ

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात असून येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या अनेक महिन्यापासुन पगार वाढ होणार असल्याचं सांगितल जात आहे. तर दुसरीकडे घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यासह चार भत्ते देखील वाढणार आहेत.
तसचं ३४ टक्के महागाई भत्त्याबद्दल विचार केला तर आता मोदी सरकारकडून ३ टक्के घरभाडे भत्ता आणि ३ टक्के प्रवास भत्ता सुद्धा वाढवला जाऊ शकतो. त्याचबरोबर समान भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीबद्दल सांगायचं झालं तर त्यात वाढ होणार आहे. यामध्ये कर्मचार्यांच्या मासिक पीएफ, ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमध्ये देखील वाढ होणार आहे. या सर्व गोष्टीवर निर्णय होणार असल्याचं सांगितल जात आहे. जुलै महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. तसचं हे दर प्रत्येक प्रदेश, शहरा नुसार बदलत असतात.
सध्या हे दर तिन्ही श्रेणींसाठी किमान एचआरए रुपये ५ हजार ४००, ३ हजार ६०० आणि रुपये १ हजार ८०० आहे. तर एक्स,वाई, झेड अशा तीनही श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या एचआरएमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आता कर्मचार्यां २७ टक्के, १८ टक्के आणि ९ टक्के दराने एचआरए दिला जातो. पगार वाढीनंतर ते २७ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढेल, परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा DA ५० टक्के पार करेल. यामुळे वार्षिक एचआरए २० हजार ४८४ रुपयांनी वाढणार आहे. त्याचबरोबर सातव्या वेतन मॅट्रिक्सनुसार, कर्मचार्यांचे कमाल मूळ वेतन ५६ हजार ९०० रुपये आहे, जर एचआरए २७ टक्के असेल तर पगारात २० हजारांचा फायदा होणार आहे. यामुळे लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.