पीडीएफए फुटबॉल : कमांडोज विजयी; महेकची हॅट्ट्रिक

पुणे : कमांडोज संघाने गुरुवारी येथे पीडीएफए महिला लीगमध्ये केशव माधव प्रतिष्ठानवर ६-० गोलने दणदणीत विजय मिळवत आपली आगेकूच कायम राखली. यामध्ये महेक शेख हिने आपली छाप पाडताना शानदार हॅट्ट्रिक साधली.
अ गटाच्या एकतर्फी झालेल्या सामन्यात, महेकने १५ व्या, २१ व्या, ५९ व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी केली. सामन्यात कविता यादव (२३ वे), कांचन शर्मा (३४ वे), हर्षदा शर्मा (४५ वे) यांनी अन्य गोल केले.
उत्कर्ष क्रीडा मंचने त्यांच्या ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी आपापल्या लढती जिंकून आजचा दिवस साजरा केला. ब गटात विविका दयाल (११ वे) हिने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर उत्कर्ष क्रीडा मंच अ संघाने एफसी बेकडिन्होचा १-० गोलने पराभव केला. उत्कर्षच्याच ब संघाने अरणा सिंधव (१३ वे) आणि अनिका टोपले (५६ वे) या दोघींनी केलेल्या गोलच्या जोरावर सासवड एफसीचा २-० ने पराभव केला.
निकाल : एसएसपीएमएस मैदान महिला लीग
- गट ब : उत्कर्ष क्रीडा मंच ‘अ’: १ (विविका दयाल ११ वे) वि. वि. एफसी बेकडिन्हो : शून्य.
- गट अ : उत्कर्ष क्रीडा मंच ‘ब’: २ गोल (अरणा सिंधव १३ वे; अनिका टोपले ५६ वे) वि. वि. सासवड एफसी : शून्य.
- गट अ : कमांडोज : ६ गोल (महेक शेख १५, २१ व ५९ व मि., कविता यादव २३ वे, कांचन शर्मा ३४ वे, हर्षदा शर्मा ४५ वे,) वि. वि. केशव महादेव प्रतिष्ठान : शून्य.
- गट अ – सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स : ३ गोल (पीयुषा नरके ४ थे, ५१ वे,; अभिलाषा मेहरा ४१ वे,) वि. वि. दिएगो ज्युनियर्स : १ गोल (यशिका तेजवानी)
- एसएसपीएमएस मैदान द्वितीय विभाग, सुपर-८
- डेक्कन इलेव्हन ‘सी’ : शून्य बरोबरी वि. डायनामाईट्ससह शून्य.