Top 5ताज्या बातम्यापुणे
अखेर पुणेकरांच्या स्टेटसवर दिसला पहिला पाऊस, पाहा व्हिडीओ!

पुणे – गेल्या कित्येक दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा सर्वांना लागली होती. आज मान्सूनचं राज्यात आगमन झालं आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी आल्या आहेत. मुख्य शहर असलेल्या पुणे शहरातही पावसाचं आगमन झालं आहे.
पुणे शहरातील मुख्य रस्ते पावसाच्या पाण्याने स्वच्छ धुवून निघाले आहेत. सकाळपासून मोठ्या प्रमाणात ऊन होते, मात्र दुपारी ढगाळ वातावरण झाले आणि त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. कर्वे रोड, स्वारगेट, हडपसर, कात्रज, वारजे, चांदणी चौक या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. उकाड्याने त्रासलेले पुणेकर अखेर सुखावले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने याधी वर्तवलेला अंदाज फोल ठरला होता. मात्र आता पावसाच्या आगमनामुळे बळीराजाही सुखावला आहे. पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.