ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा नुपूर शर्मांना पाठिंबा; म्हणाल्या…

भोपाळ : (MP Pragya Thakur On Controversial statement) दोन दिवसांपुर्वी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांना तडकाफडकी पक्षातून निलंबित करणाऱ्या आले. मात्र, आता नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आसणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. आता या निमित्ताने पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.

दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह पुढे म्हणाल्या, खरं बोलणं जर विद्रोह असंल तर आम्ही देखील विद्रोही आहोत. जय ‘सनातन, जय हिंदुत्व’ अशी घोषाबाजीही त्यांनी यावेळी केली. या ट्विटनंतर खासदार म्हणाल्या, मी खरं बोलण्यासाठी बदनाम आहे. ज्ञानवापी मशीदीचं नाव न घेता त्यांनी म्हटलं की, हे सत्य आहे की, तिथं शिवमंदिर होतं आणि कायम राहिल. हा आमच्या हिंदू देवता आणि सनातन धर्मावर आघात आहे.

एवढ्यावरचं थांबतील त्या साध्वी प्रज्ञा सिंह कसल्या पुढे त्या म्हणाल्या, याचा अर्थ असा आहे की, इतिहास कुठे ना कुठे विकृत झाला आहे. हा भारत असून तो हिंदुचा देश आहे. इथं सनातन धर्म जिवंत राहिल आणि जिवंत ठेवावं लागेल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे निधर्मी लोक आपली मानसिकता प्रत्येक ठिकाणी स्थापन करु पाहत आहेत. सनातन धर्म हा मानवीय धर्म आहे. असे ही प्रज्ञा सिंह म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये