देश - विदेश

व्हीआर बॉयलरचे कार्य उत्तमच; अजित पवार यांनी केले कौतुक

बारामती : जिद्द, चिकाटीच्या जोरावर नोकरी सोडून स्वतःचा उद्योग उभारून ग्राहकास उत्तम सेवा देत असताना अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे व्ही आर बॉयलरचे कौतुकास्पद कार्य असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती एमआयडीसीमधील व्ही आर बॉयलर अँड सोल्यूशन कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष बाळासो जाधव, बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद काकडे, उपाध्यक्ष पंढरीनाथ कांबळे, बारामती मॅनुफॅक्चरिंगचे अध्यक्ष धनंजय जामदार, पंचायत समितीचे माजी गटनेते दीपक मलगुंडे, मराठा सिक्युरिटीचे संचालक प्रवीण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

बॉयलर रिपेअरिंग आणि पाइप फॅब्रिकेशनचे काम बॉयलरसाठी लागणारी चिमणी बनविणे, तसेच पेंटिंग करून देणे, बॉयलर ऑपरेशन आणि वार्षिक मेंटेनन्स त्यासाठी लागणारे सर्व मटेरियल पुरवठा बॉयलरसाठी लागणारे सर्व आय बी आर वॉल आणि माउंटिंग फिटिंग, बॉयलर आणि स्टीम पाईपिंगसाठी लागणारे इन्सुलेशनचे मटेरियल जसे की एलआरबी हॉट इन्सुलेशन आणि अ‍ॅल्युमिनियम क्लॅडींग व त्या कामाकरिता लागणारे कुशल कामगार वर्ग, बॉयलर फर्नेस रीफॅक्टरीसाठी लागणार्‍या फायर ब्रिक आणि रिफॅक्टरी सिमेंट व त्या कामाकरिता लागणारे कुशल कामगार वर्ग, नवीन प्लांट कंपनी उभारणीसाठी लागणार्‍या मशीनरी बसवणे, त्यासाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या पाइप लाइन तयार करणे, शेड उभारून देणे, तसेच सर्व प्रकारच्या मशीनरी इरेक्शन कमिशनिंग करून प्लांट चालू करून देणे अशा प्रकारे सर्व काम व्ही आर बॉयलरच्या माध्यमातून केली जात असल्याचे संचालक राजाराम सातपुते यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले. उपस्थितांचे स्वागत गौरव सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले. कार्यक्रमास मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये