क्राईमपुणेरणधुमाळी

“येरवडा परिसर भ्रष्टाचारमुक्त करा”: राजीव चंद्रशेखर

केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून भ्रष्टाचारमुक्त येरवडा करण्याचे आवाहन भाजपचे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना केले. ते लक्ष्मीनगर येरवडा येथे पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष अनवर पठाण यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेटीदरम्यान बोलत होते.

येरवडा- Pune News | ‘शहरातील सर्व बूथ मजबूत करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी या भेटीचे आयोजन केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून सर्व केंद्रीय योजना जनतेपर्यंत पोहचविणे काळाची गरज आहे. त्यासाठी बूथ अध्यक्षांनी काम करावे. याबरोबरच डिजिटल पेमेंटमुळे नागरिकांसह शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सरकारचे पैसे पोहोचत आहे ही आनंदाची बाब असून, कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

डिजिटल पेमेंट ट्रान्सफरमुळे अर्थव्यवस्था चांगली मजबूत होत आहे. त्यामध्ये आणखी चांगले बदल केले जातील. आरोग्य, शिक्षण व रोजगार यामध्ये केंद्र सरकार चांगले काम करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले.

यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपुरे, विभाग अध्यक्ष संतोष खांदवे, राजू बाफना, विजय चौगुले, गणेश देवकर, रमेश गव्हाणे, सुरज दुबे, किशोर विटकर, विकास सोनवणे, जिलानी शेख, फय्याज शेख, गणेश ढोकले, प्रतीक कावरे, सोमनाथ अढांगळे, पप्पू कांबळे, नितीन गायकवाड, मुन्ना सय्यद, खालिद पठाण, अमीर शेख, राहुल चांडलिया आदी उपस्थित होते.

पठाण यांच्या हस्ते चंद्रशेखर यांना पुणे पगडी, शाल देऊन व विकास सोनवणे व सामाजिक कार्यकर्त्या काजल सोनवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

चंद्रशेखर पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात विरोधकांची सत्ता असून, निवडणूक काळात हे पुढारी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून प्रभागात विकास कामे करण्याची आश्वासने देत आहेत. तरी निवडणूक झाल्यानंतर अशा उमेदवारांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. प्रभागात आजही अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे भर पावसाळ्यात पूरपरिस्थितीचा सामना करण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर येते. जनतेने वेळीच जागे होण्याची वेळ आहे.’

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये