ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

पालखी सोहळ्यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती!

पुणे | Palkhi Sohala 2022 – “पुणे पोलिसांकडून लाईव्ह पालखी ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध राहणार आहे. पालखी मार्गाची सर्व माहिती वाहन चालकांसाठी मिळावी यासाठी diversion.punepolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळणार आहे. मोबाईलवर एका क्लिकवर पालखीचे सगळे अपडेट मिळणार आहेत.” अशी माहिती पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले, पुण्यात एक पालखी दोन दिवस, तर दुसरी तीन दिवस असणार आहे. शहरात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मुक्कामाची तयारी पोलिसांनी केली आहे. खुले असलेले रस्ते, बंद रस्ते, पालखीचा मुक्काम या सगळ्यांसह वाहतुकी बद्दल सगळे अपडेट मिळणार आहेत.”

तसंच, नागरिकांसाठी पार्किंगची सोय कुठे केली आहे. हे देखील संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पहिल्यांदाच ड्रोनद्वारे पोलीस पाहणी करणार आहेत. शहरात एकूण चार हजार पोलीस बंदोबस्त असणार आहे. यामध्ये दोन अपर पोलीस आयुक्त, ९ पोलीस उपायुक्त, १९ पोलीस आयुक्त, १०३ पोलीस निरीक्षक, ३०७ सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, सहायक, पोलीस अंमलदार, वाहतुक पोलीस असा फौजफाटा असणार रस्त्यावर आहे.” अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये