केंद्रीय निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचे आरोप फेटाळले; मतमोजणी सुरु

मुंबई – Legislative Council Election| विधानपरिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. मात्र कॉंग्रेस नेत्यांकडून काही आक्षेप घेण्यात आल्याने मतमोजणी प्रलंबित ठेवण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेसच्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हस्तांतरित केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्या आक्षेपांवर आपला निर्णय दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने कॉंग्रेसकडून करण्यात आलेले आरोप फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लवकरच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल. या निकालाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.
कॉंग्रेस कडून भाजप नेत्यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आले होते. भाजपच्या मुक्त टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला होता. टिळक आणि जगताप यांची मतपत्रिका दुसऱ्या व्यक्तीने मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तो आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. त्यामुळे आता मतमोजणी प्रक्रिया सुरु झालेली असून लवकरच विधानपरिषदेत कोणाचा गुलाल उधळणार हे बघता येणार आहे.