Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
“सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”; एकनाथ शिंदेंच्या ट्विटने खळबळ!

मुंबई – Eknath Shinde | शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल होते. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आपलं नाव हटवलं आहे. त्यासोबतच शिवसेनेने त्यांच्यावर कारवाई केली आहे. शिंदे यांना विधीमंडळाच्या गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे.