ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

‘हा’ मराठमोळा अभिनेता एकनाथ शिंदेंचं ट्विट रिट्वीट करत म्हणाला…

मुंबई: काल (सोमवार) विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेनेच्या 12 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरातला गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला दिसत आहे. तसंच विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावर आता मराठी अभिनेत्याने एक रिट्वीट केलं आहे. त्याचे हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आलं आहे.

मराठी अभिनेता आरोह वेलणकर हा नेहमीच विविध राजकीय विषयांवर मत मांडताना दिसतो. त्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो. तसंच सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडीवर आरोहने तीन ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आरोह वेलणकर याने नुकतंच एकनाथ शिंदेच्या ट्विटला रिट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केलं आहे. त्यावर आरोह वेलणकरने रिट्विट करत ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असं ट्विट केलं आहे.

तसंच आरोह वेलणकरने आणखी एक ट्विट केलं आहे. “संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये झालेला गोंधळ आणि अनागोंदी पाहावी”, असंही त्यानं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर “अनेक मराठी वाहिन्यांवर एकनाथ शिंदेंसोबत १२ शिवसेना आमदार नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे. नक्कीच काहीतरी मोठं घडणार”, असं ट्विट देखील आरोह वेलणकरने केलं आहे. तसंच त्याने केलेल्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये