गरजू मुलांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा उभारल्याचे समाधान
पुणे- City News | समाजातील गरीब व गरजू मुलांसाठी विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष यासह इतर अत्याधुनिक सोयीसुविधा उभारता आल्याचे समाधान आहे. निवृत्तीनंतर सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून दिलेली देणगी सत्कारणी लागली, असे मत सामाजिक कार्यकर्त्या रुक्साना अंकलेसारिया यांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंकलेसारिया कुटुंबाच्या अर्थसाहाय्यातून नामदेवराव मोहोळ महाविद्यालय अँड क्रीडा प्रतिष्ठान संचालित टीजी गोसावी महाविद्यालय, विठ्ठलवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या ‘नरिमन अर्देशीर’ दुमजली इमारतीचे, रतनलाल मर्चंट हॉल (संगणक कक्ष), नौरोजी प्रकाश हॉल (विज्ञान प्रयोगशाळा) अंकलेसारिया पाणपोई आदी सोयीसुविधांचे उद्घाटन करण्यात आले.
गरजू विद्यार्थ्यांसाठी या सोयीसुविधा उपलब्ध केल्याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम होणार आहे. चांगले संस्कार व शिक्षण यासोबतच अत्याधुनिक सोयीसुविधा गरजेच्या आहेत.
फत्तेचंद रांका, अध्यक्ष, क्रेडाई
यावेळी मेहेर मानेकजी अंकलेसारिया, रुक्साना मेहेर अंकलेसारिया, खोर्देह मेहेर अंकलेसारिया, हेमंत नाईक, फत्तेचंद रांका, परमानंद शर्मा, सुनील चेकर, माजी खा. अशोकराव मोहोळ, सदानंद मोहोळ, मीरा मोहोळ, रोहिदास मोरे, बाळासाहेब गांजवे, उद्योजक तुषार गोसावी, संग्राम मोहोळ, डॉ. हिरेन निरगुडकर, सदाशिव लाळे, प्राचार्य किरण सूर्यवंशी, लायन्स क्लबच्या अध्यक्ष दीपाली गांधी, आशा ओसवाल, पूनम अष्टेकर, अंजली ओसवाल, माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी आदी उपस्थित होते.