प्रसिद्ध अभिनेत्रीचं उद्धव ठाकरेंवरील ट्विट होतंय तुफान व्हायरल; पहा नेमकं काय म्हणाली
मुंबई : महाराष्ट्रात जी राजकीय स्थिती झालेली आहे. याची चर्चा संपूर्ण देशभरात सुरु आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडेल की काय अशी शंका सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी देखील मिम्सचा वर्षाव केला आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री देखील या प्रकरणात उद्या घेतल्या आहेत.
सिने अभिनेते आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडींवर क्रिया प्रतिक्रिया देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बुधवारी झालेल्या लाईव्ह नंतर त्यांच्याबद्दल अनेक लोक भूक झालेले दिसले यात अभिनेते आणि अभिनेत्री देखील आहेत. दरम्यान बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गोहर खाननं ट्विट करून दिलेली प्रतिक्रया सध्या चर्चेत आहे.
गोहर खाननं एक ट्विट केल आहे. ज्यात तिने उद्धव ठाकरे हे मला युनिटी चे बेस्ट उदाहरण वाटतात असं म्हटलं आहे. त्याचबरोबर सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि प्रगती हेदेखील उद्धव ठाकरेंच्या वागण्यातून दिसते असंही गोहरने आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे..