ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

“…तर या बंडाला अर्थ काय?”; शरद पवारांनी दिल्लीत खोलले ‘पत्ते’

दिल्ली : बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाविकास सरकार संकाटात आले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते गेले आहेत. उद्या सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना बंडखोर आमदार परत आल्यावर त्यांनी आपली भूमिका बदललेली असेल असं पवार म्हणाले.

दरम्यान पवार पुढे म्हणाले, जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भाजपनं एवढं महाभारत घडवलं त्याचा फायदा काय? असा प्रश्न त्यांनी केला आहे. बंडखोरांनी गुजरात आणि आसाम हे दोन राज्य निवडले आहेत त्या राज्यात भाजपचे सरकार आहे. बंडखोरांकडे संख्याबळ असेल तर ते गुवाहटीत का थांबले आहेत? महाराष्ट्रात येवून सरकार स्थापन करावे त्यांना कोणी रोखलं आहे, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे.

एका व्हायरल व्हिडोओमध्ये बंडखोरांनी आपल्या पाठीमागे राष्ट्रीय पक्ष असल्याचं सांगितलं पण भाजपशिवाय दुसरा पाठिंबा देणारा पक्ष कोणता आहे? असं म्हणत शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे. मात्र, आमची उद्धव ठाकरे यांच्यासोबत कमिंटमेंट आहे, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. बंडखोरांवर कारवाई करायची का नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील. येत्या दोन तीन दिवसांत कारवाई होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बंडखोर महाराष्ट्रात आल्यास ते शिवसेनेसोबत राहातील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये