ताज्या बातम्यामनोरंजन

“भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही”; अमोल कोल्हेंचा ‘हा’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई: सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तसंच ऐतिहासिक चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा देखील वाढला आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका म्हटलं की अमोल कोल्हे यांचा चेहरा डोळ्यापुढे उभा राहतो. तसंच अमोल कोल्हे यांनी ‘गरुडझेप’ चित्रपटामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या टीझरमध्ये अमोल कोल्हे यांचा पाठमोरा भाग दिसत आहे. तसेच टीझरची सुरुवातच त्यांच्या दमदार संवादाने होत आहे.

या टीझरमधील “भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही” हा संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका आणि त्यादरम्यान घडलेला प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. शिवप्रताप या सीरिज अंतर्गत चार ऐतिहासिक चित्रपटांमधून इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा अमोल कोल्हे यांचा प्रयत्न आहे. तसंच जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये