बळीराजासाठी अच्छे दिन! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

मुंबई – नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या अडीच वर्षात सरकार काय काम करणार आहे?, याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करायची असल्याचं शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी अशा काही योजनांची तरतूद करायची आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीशा करायच्या असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास मुंबईतील दळणवळण यंत्रणा सक्षम होईल. शेतकऱ्यांशी संबंधित जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्प रखडलले आहेत ते प्रकल्प मार्गी लागले तर मोठ्या प्रमाणातील पाण्याचं सिंचन होईल. बळीराजा हा आपला मायबाप आहे. त्याला सुखी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं शिंदे म्हणाले.
दरम्यान, राज्यात मोठमोठे उद्योग येतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल. राज्याच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करु, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.