Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र
शरद पवारांना मोठा धक्का; महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त!

पुणे- राज्य कुस्तीगीर संघटनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तावाकडे दुर्लक्ष देखील केलं जात आहे असं सांगत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात संदीप भोंडवे यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या परिषदेचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत. यामुळे हा शरद पवारांना मोठा धक्का असल्याचे म्हणले जात आहे. दरम्यान हे सगळ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळेच झाल आहे ते अगदी अध्यक्षांचा सुद्धा आदेश जुमानत नव्हते असा आरोप देखील पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी लांडगे यांच्या मुलावर देखील आरोप केले आहेत.