‘म्हणून मी गुवाहाटीची ऑफर नाकारली’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतल्यानंतर त्यांना शिवसेनेने सेनेपादावरून हटवले आहे. शिंदे गटाने बंड केला तो ईडीला घाबरून असा आरोप संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे. त्यांनाही शिंदे गटाकडून ऑफर आली होती पण ते आहारी गेले नाहीत यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.
शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते शिव्सेनेंचे मुख्यमंत्री नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर शिंदे गटाने सेनेची फसवणूक केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील लोक भाजप सारखेच वागल्याचंही राऊत म्हणाले. ‘ईडीच्या भीतीने आमदारांनी बंड केला. भाजपला शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे म्हणून भाजपने शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवली’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही असं ते म्हणाले. शुक्रवारी ईडीने संजय राऊत यांची तब्बल १० तास चाकाशी केली. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या १ हजार ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे.