ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उद्धव ठाकरेंसोबत 15 नाराज खासदारांची बैठक, सदाशिव लोखंडे

मुंबई : (Sadashiv Lokhande On Shivsena) राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं नविन सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत राज्यातील सत्तांतर घडवलं. आमदारांनंतर शिवसेनेतील खासदारही फुटणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे तब्बल 15 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या तर्क-वितर्क लागले जात आहेत. या खासदारांमध्ये शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. याबाबत लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता लोखंडे यांनी प्रत्येक प्रश्नाला थेट उत्तर देण्याचं टाळलं.

मात्र, लोखंडे म्हणाले की, 15 खासदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या मागच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याची भूमिका मांडली. त्यावेळी सर्व खासदारांचा सूर असाच होता, ज्यांच्याविरोधात आपण लढलो, ते परिपूर्ण होत आहेत. आपण शिवसेना कमकुवत होत आहे, अशी खंत खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली होती. याच संदर्भात सोमवारी दि. ११ रोजी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत आम्ही आमची भूमीका मांडू, असे खासदार लोखंडे म्हणाले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये