“इथून चालता हो…”, ‘ही’ हाॅलिवूड अभिनेत्री रागवली रणबीर कपूरवर

मुंबई | Ranbir Kapoor Got Angry Reaction From Natalie Portman – बाॅलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसंच रणबीरचे भारतात आणि परदेशात असंख्य चाहते आहेत. मात्र अनेक हाॅलिवूड (Hollywood) कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरूख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) या कलाकारांव्यतिरिक्त इतर कलाकारांना जास्त ओळखत नाहीत. असंच काहीसं रणबीर सोबत घडलं होतं. त्याने याच संदर्भातला एक किस्सा ‘द कपिल शर्मा शो’ (The kapil Sharma Show) मध्ये सांगितला होता.
रणबीर कपूरनं 2016 मध्ये ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं हॉलिवूड अभिनेत्री (Hollywood Actress) नॅटली पोर्टमनसोबत (Natalie Portman) घडलेला एक किस्सा शेअर केला होता. रणबीर कपूर म्हणाला होता, “मी त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये होतो आणि अक्षरशः धावत हॉटेलमध्ये जात होतो कारण मला वॉशरूमला जायचं होतं. पण मी अचानक तिथे नॅटली पोर्टमनला पाहिलं. मी तिचा खूप मोठा चाहता आहे आणि म्हणून मी तिला सेल्फीसाठी विचारलं. पण तिने चिडून मला तिथून निघून जाण्यास सांगितलं.”
“नॅटली माझ्यावर चिडल्यामुळे मला थोडं दुःख झालं होतं. कारण ती ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ चित्रपटाची अभिनेत्री आहे. मी खूप उत्साहित होतो आणि त्या उत्साहाच्या भरात मी लक्षच दिलं नाही की ती दुःखी होती आणि रडतही होती. त्यामुळे जेव्हा मी तिच्याकडे सेल्फीसाठी विचारणा केली तेव्हा तिने रागात माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाली, “इथून चालता हो.” मी त्यावेळी दुःखी झालो होतो. पण मी आजही तिचा चाहता आहे. मला तिचं काम खूप आवडतं. जर ती पुन्हा कधी भेटली तर पुन्हा मी तिला सेल्फीसाठी विचारेन,” असं देखील रणबीर कपूरनं सांगितलं. तसंच त्याने शेअर केलेला हा किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे.