ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडून विरोधी पक्षातील नेत्यांना कायदेशीर नोटीस

नवी दिल्ली – Central Minister Smriti Irani Notices Congress : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटीस पाठवली आहे. स्मृती इराणी यांच्या मुलीचा दिल्लीमध्ये अवैध मद्यव्यवसाय असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. त्यावर आता इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेष, नीता डिसुजा यांच्यासह काँग्रेसला नोटीस बजावली आहे.

माझ्या मुलीच्या विरोधात खोटे आरोप करण्यात आले असून आरोप करणाऱ्यांनी लिखित स्वरूपात माफी मागावी व आपले आरोप मागे घ्यावेत अशी मागणी स्मृती इराणी यांनी नोटीशीद्वारे केली आहे.

गोव्यात स्मृती इराणी यांच्या मुलीच्या नावे चालणाऱ्या हॉटेल मध्ये अनधिकृतरित्या दारू विकली जाते असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. त्याचबरोबर आम्ही मिळवलेली माहिती खोटी नसून माहितीच्या अधिकारातून मिळवली आहे. त्याचबरोबर माहिती खरी असल्याचं आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

“आमच्या अशिलाची आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेची आपण सर्वांकडून बदनामी केली जात आहे. आमच्या अशिलाच्या मुलीने कोणताही बार सुरु करण्यासाठी किंवा कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज केलेला नाही. त्याचबरोबर गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाकडूनही मुलीला कोणतीही नोटीस आलेली नाही” असं स्पष्ट स्मृती इराणी यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये