उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी

खडकवासला : शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाक यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड फाटा सिंहगड रोड येथे मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी आणि सदस्य नोंदणी शिबिराचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातर्फे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदे यांचे हस्ते झाले.
शिबिरासाठी प्रसिद्धीप्रमुख दीपक जगताप, अमरावती माजी जिल्हाप्रमुख सिद्धेश्वर चव्हाण, युवासेना जिल्हाधिकारी सचिन पासलकर, कोथरूड सोशल मीडिया समन्वयक नितीन भामे, उपतालुकाप्रमुख तानाजी गाढवे, भरत चावट पाटील, मा. तालुकाप्रमुख संदीप मते, युवासेना जिल्हा समन्वयक सुशांत खिरीड, उपतालुकाप्रमुख संतोष शेलार, अविनाश सरोदे, लक्ष्मण वाघ, संतोष जावळकर, राजेंद्र वाघ, वर्षा संतोष शेलार, डॉ मनोहर डोळे फाउंडेशन, मेडपाथ लॅबोटरी आणि डॉ. रूपेश पाटील डहाके, समन्वयक वंदनीय बाळासाहेब ठाक शिवसेना वैद्यकीय मदत वसई विरार मुंबई, खडकवासला युवासेना सोशल मीडिया समन्वयक दीपक खिरीड, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, अण्णा पोकळे, सुजाता भीमाशंकर काशेट्टी यांनी सहकार्य केले.