ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

राज्यपालांना माफी मागायलाच लावली, ही प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई; जितेंद्र आव्हाड

मुंबई : (Jitendra Awhad On Maharashtra Governor) राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवार दि. २९ जून रोजी अंधेरीत “मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणसांना काढले तर मुंबईत पैसेच उरणार नाहीत आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानीच राहणार नाही” असे वक्तव्य केले होते. राज्यपालांच्या केलेल्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तिव्र रोष निर्माण झाला होता.

दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे म्हणत, राज्यपालांनी आज आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पत्रकाद्वारे जाहिर माफी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज राजभवनावर राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली. राज्यपालांच्या माफीनाम्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांनी माफी मागितली नाही, माफी मागायला लावली आहे.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ही प्रत्येक मराठी माणसाची लढाई होती. त्यांनाी केलेले वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयाला, काळजाला भिडले होते. राज्यपालांना माफी मागायला लावली गेली आहे. याचा राजकीय त्रास ते ज्या पक्षाशी संबंधित आहेत त्या पक्षाला झाला आहे. ही माफी त्यांनी माफी अशीच मागितली नाही. महाराष्ट्रात ढवळले गेलेले वातावरण,लोकांच्या मनात निर्माण झालेली चीड आणि प्रत्येक क्षणाला मराठी माणसाच्या ह्रदयात लागलेली आग ही कुठल्यातरी एका पक्षाला सतावणारी होती त्यामुळे कोश्यारी यांनी माफी मागितली, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये