ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

बंडखोर आमदार उदय सामंतांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला!

पुणे : (Shiv Sainik On Uday Samant) दिड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली अन् राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात वाक् युद्ध सुरू झाले. आज मात्र, पुण्यात या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, पुण्यातील कात्रज भागात शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे ‘शिवसंवाद’ निष्ठा यात्रेच्या माध्यमातून सभा झाला. उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकण्यात आल्याचे समोर आले आहे.

गद्दार-गद्दार असे म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान कात्रज भागात आज आदित्य ठाकरे यांची सभा होती. याच भागातून उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना ट्राफिक खोळबंली होती, यादरम्यान शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये