ताज्या बातम्यारणधुमाळी

“राष्ट्रवादीचा नाम जप करू नका…”,रुपाली ठोंबरेंचा बंडखोरांना टोला

मुंबई | Rupali Thombare On Criticized Rebel MLA – शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला असता बंडखोर आमदार राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. तर अनेकांनी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली असे आरोप केले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला आहे.

रुपाली ठोंबरे यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. “राष्ट्रवादी राष्ट्रवादी नाम जप करू नका. आमचा आपल्या छल कपट केलेल्या उत्तराशी कोणताच संबंध नाही. तुम्ही केलेल्या पापी कृत्याचा उद्रेग तुमचं तुम्ही भोगा आमचं नाव घेऊ नका. आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत आम्ही टरफले उचलत नाही”, असा टोला रुपाली ठोंबरे यांनी लगावला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ”बंडखोरांच्या या वक्तव्यावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील उत्तर दिलं होतं. आधी भाजपासोबत युतीत होतो तर भाजपा त्रास देतेय. भाजपा त्रास देत होती शिवसेनेला खोटं ठरवत होती. आपल्यासोबत ठरवलेल्या गोष्टीला नकार होता म्हणून महाविकास आघाडीला जन्म दिला तर काँग्रेस, राष्ट्रवादीवाले त्रास देत आहेत म्हणायला लागले, मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय?” असा प्रश्न बंडखोराना उद्धव ठाकरेंनी केला होता

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये